जगभरातील स्त्री चित्रकार आणि त्यांची चित्रे

जगभरातील स्त्री चित्रकारांनी, समाजात स्त्री म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक, चित्रकला शिक्षण, त्यासाठी करावा लागणारा प्रवास आणि अर्थसहाय्य या सगळ्याला वर्षानुवर्षे तोंड देऊन उत्तम चित्रे रेखली आणि स्वतः ची ओळख निर्माण केली. त्या सगळ्या प्रवासाचा, विविध स्त्री चित्रकारांच्या कलाकृतीचा, चित्रातून प्रतिबिंबित होणाऱ्या त्यांच्या आयुष्यातील घडामोडींचा आढावा या व्याख्यानातून घेतला आहे.

वक्ते बद्दल

शर्मिला फडके या मुक्त लेखक, कला-इतिहास अभ्यासक, समिक्षक आणि अनुवादक आहेत. मुंबई विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारिता आणि नंतर कला-इतिहासाचे विशेष शिक्षण घेऊन आपल्या आवडीलाच व्यवसायाचे स्वरुप दिले. भारतीय प्राचीन संस्कृती, कला-इतिहासाचा अभ्यास आणि संशोधनामधे त्या कार्यरत असतात. चित्रकला, प्रवास, साहित्य या विषयांवर गेल्या पंधराहून अधिक वर्षांत त्यांनी विविध दैनिके, मासिके, दिवाळी अंकांमधे सातत्याने सखोल लेखन केले आहे. ’चिन्ह’ या कला-वार्षिकाशी त्या लेखक आणि कार्यकारी संपादक या नात्याने जोडलेल्या आहेत. गेल्याच वर्षी त्यांची “फोर सीझन्स” ही पर्यावरणाशी असलेल्या मानवी नात्याशी संबंधीत कादंबरी मेहता प्रकाशनातर्फ़े प्रकाशित झाली आहे. पॉप्युलर तसेच मेहता प्रकाशनातर्फ़े त्यांची एकुण आठ अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चित्रकार राजा रविवर्मा यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा वेध घेणा-या पुस्तक प्रकल्पावर त्या सध्या काम करीत आहेत.

Be the first to add a review.

Please, login to leave a review
Add to Wishlist
Enrolled: 257 students
Duration: 2 hrs
Video: 2 hours
Level: Beginner

Archive

This function has been disabled for INSTUCEN.