Have a question?
Message sent Close

मुक्तछंद लेखन

Instructor
Sanket Mhatre
0
0 reviews
  • Description
  • Curriculum
  • Reviews
Muktachand Lekhan 2023

Summary
दिनांक: १ एप्रिल २०२३
मार्गदर्शक: संकेत म्हात्रे
वेळ: सकाळी ८ ते ९९
शुल्क: ₹७५०/- फक्त‌

अभ्यासक्रमात काय शिकवले जाईल?
कवितेला (बहुतांश कवींनी) आत्म्याची अभिव्यक्ती म्हटले आहे. आनंद साजरा करण्याकरता, तिरस्कार दर्शवताना, प्रेम व्यक्त करताना कविता यशस्वी होते. कविता मानवी स्थितीतील लय शोधते आणि व्यक्त होत राहते. कवितेला कोणतेही काल्पनिक शब्द नको असतात, मात्र स्वतःशी प्रामाणिक राहणे कवितेसाठी अत्यावश्यक आहे एवढं नक्की.

संकेत म्हात्रे यांची ही कार्यशाळा तुम्हांला कवितेच्या उत्क्रांतीविषयी, प्रामुख्याने विसाव्या शतकातील मुक्त छंदाची उत्क्रांती समजून घेण्यास मदत करेल. ही कार्यशाळा तुम्हांला तुमचा आतला आवाज व लय शोधायला मदत करेल आणि जीवनासंबंधीच्या तुमच्या दृष्टिकोनातून इतर कवी-लेखकांच्या साहित्याचा अर्थ कसा लावावा, हे समजावून देईल.

ही कार्यशाळा ज्यांना कविता लिहायची आहे आणि ज्यांना आपले काव्यलेखन अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण व्हावे असे वाटते, त्यांच्याकरता आहे.

यात अर्थ लक्षात घेणे, स्व-समीक्षा आणि संपादन, यमकापेक्षा लयीवर लक्ष केंद्रित करणे आणि वाक्यांचे कवितेत रूपांतर करणारे तंत्र आदी बाबींचा समावेश असेल.

मार्गदर्शक बद्दल माहिती:
जाहिरात, कविता, कथालेखन, स्तंभलेखन , गीतलेखन आणि काव्य संचालन अशा विविध प्रांतातून संकेत म्हात्रे गेली १५ वर्षे मुशाफिरी करतो आहे. संकेतच्या कारकिर्दीची सुरवात काव्योत्सव २००१ पासून झाली. त्याच धर्तीवर पुढे त्याने क्रॉसओव्हर पोएम्स हा बहुभाषिक कवितांचा कार्यक्रम मुंबई, गोवा आणि इतर ठिकाणी केला.

संकेत म्हात्रे ह्याला वाग्देवी फेस्टिवल ह्या ओरिसाच्या साहित्यिक उत्सवात पहिला मराठी कवी असण्याचा मान मिळाला आहे. तसंच एकाच वर्षात जयपूर लिटरेचर फेस्टिवल
आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशा दोन्ही महत्वाच्या ठिकाणी कविता वाचन केले आहे. गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल, पोएट्स ट्रान्स्लटिंग पोएट्स,
ग्लास हाऊस पोएट्री फेस्टिवल, संयुक्ता पोएट्री फेस्टिवल अशा विविध आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवातसुद्धा सक्रिय सहभाग राहिला आहे.

मराठी कविता सर्वत्र पोहोचण्यासाठी संकेतने कविता कॅफे ह्या युट्युब चॅनेलची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले आहे ज्यात १०० हून अधिक कवितांचा समावेश आहे.

मराठी मध्ये संकेतने क, प्रिय आईस आणि इतर काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. वारसा संगीत नाटकाचा ह्या संगीत नाटकाच्या कार्यक्रमाचे इंग्रजी
आणि मराठीतून लेखन तसेच सूत्रसंचालन केले. फिल्म्स डिव्हिजन तर्फे भालचंद्र पेंढारकर ह्यांच्यावरच्या माहितीपटात त्यांनी काम केले आहे.

राधा ही बावरी ह्या मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा संकेतने लिहिले आहे ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गीत ह्याचा झी गौरव पुरस्कार देण्यात आला.

संकेत म्हात्रे ह्याचा कवडसे, मेरे कवी दोस्त ह्या लोकमतसाठी लिहिलेल्या लेखमाला खूप प्रसिद्ध झाल्या त्याचप्रमाणे आमची दुनियादारी ही महाराष्ट्र टाईम्स मधली लेखमालाही
प्रसिद्ध होत आहे. ह्यावर्षी संकेतने मंथन ह्या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादन केले आहे आणि इंग्रजी तसंच मराठी कवींना एकत्र आणण्याचं महत्वाचं काम तो करतो आहे.

त्याचा पहिला काव्यसंग्रह ‘सर्व अंशांतून आपण / The Coordinates Of Us’ वर्णमुद्रा तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे ज्याला महत्वाचे असे रजा फाऊंडेशनचे
अनुदान मिळाले आहे. गोव्याच्या रोशेल पोतकर ह्या कवयित्री सोबत लिहिलेला ह्या द्वैभाषिक संग्रहामध्ये पहिल्यांदाच मराठी आणि इंग्रजी कवितांचा एकत्रित अनुवाद केला आहे.

error: Content is protected !!