Have a question?
Message sent Close
Send message
send message to: Sanket Mhatre
You need to write a message
Message sent Close
Sanket Mhatre
Instructor
1
courses
0
जाहिरात, कविता, कथालेखन, स्तंभलेखन , गीतलेखन आणि काव्य संचालन अशा विविध प्रांतातून संकेत म्हात्रे गेली १५ वर्षे मुशाफिरी करतो आहे. संकेतच्या कारकिर्दीची सुरवात काव्योत्सव २००१ पासून झाली. त्याच धर्तीवर पुढे त्याने क्रॉसओव्हर पोएम्स हा बहुभाषिक कवितांचा कार्यक्रम मुंबई, गोवा आणि इतर ठिकाणी केला. संकेत म्हात्रे ह्याला वाग्देवी फेस्टिवल ह्या ओरिसाच्या साहित्यिक उत्सवात पहिला मराठी कवी असण्याचा मान मिळाला आहे. तसंच एकाच वर्षात जयपूर लिटरेचर फेस्टिवल आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशा दोन्ही महत्वाच्या ठिकाणी कविता वाचन केले आहे. गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल, पोएट्स ट्रान्स्लटिंग पोएट्स, ग्लास हाऊस पोएट्री फेस्टिवल, संयुक्ता पोएट्री फेस्टिवल अशा विविध आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवातसुद्धा सक्रिय सहभाग राहिला आहे. मराठी कविता सर्वत्र पोहोचण्यासाठी संकेतने कविता कॅफे ह्या युट्युब चॅनेलची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले आहे ज्यात १०० हून अधिक कवितांचा समावेश आहे. मराठी मध्ये संकेतने क, प्रिय आईस आणि इतर काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. वारसा संगीत नाटकाचा ह्या संगीत नाटकाच्या कार्यक्रमाचे इंग्रजी आणि मराठीतून लेखन तसेच सूत्रसंचालन केले. फिल्म्स डिव्हिजन तर्फे भालचंद्र पेंढारकर ह्यांच्यावरच्या माहितीपटात त्यांनी काम केले आहे. राधा ही बावरी ह्या मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा संकेतने लिहिले आहे ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गीत ह्याचा झी गौरव पुरस्कार देण्यात आला. संकेत म्हात्रे ह्याचा कवडसे, मेरे कवी दोस्त ह्या लोकमतसाठी लिहिलेल्या लेखमाला खूप प्रसिद्ध झाल्या त्याचप्रमाणे आमची दुनियादारी ही महाराष्ट्र टाईम्स मधली लेखमालाही प्रसिद्ध होत आहे. ह्यावर्षी संकेतने मंथन ह्या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादन केले आहे आणि इंग्रजी तसंच मराठी कवींना एकत्र आणण्याचं महत्वाचं काम तो करतो आहे. त्याचा पहिला काव्यसंग्रह 'सर्व अंशांतून आपण / The Coordinates Of Us' वर्णमुद्रा तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे ज्याला महत्वाचे असे रजा फाऊंडेशनचे अनुदान मिळाले आहे. गोव्याच्या रोशेल पोतकर ह्या कवयित्री सोबत लिहिलेला ह्या द्वैभाषिक संग्रहामध्ये पहिल्यांदाच मराठी आणि इंग्रजी कवितांचा एकत्रित अनुवाद केला आहे.
Member since March 2023
  • Courses
  • Reviews
Courses reviews
All ratings
  • 5 stars
  • 4 stars
  • 3 stars
  • 2 stars
  • 1 stars
Nothing to show yet
  • 1
error: Content is protected !!